“… त्यांनी संघराज्य, लोकशाहीवर न बोललेलं बर”; अतुल भातखळकरांचा रोहित पवारांवर निशाणा

महाराष्ट्र News 24

कुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी पुतण्या म्हणून राजकारणात किंमत असलेल्यांपैकी मोदी नाही, असं म्हणत भातखळकरांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यघटना आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

ज्यांच्या राजकारणाचे दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभे आहे, त्यांनी संघराज्य, लोकशाही या विषयावर इतकं पेटून न बोललेलं बरं, असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यघटनेचा गाभा असलेल्या संघराज्य पद्धतीला जपण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून केंद्राची आहे. पण आज या गाभ्यालाच तडा जातो की काय, अशी भीती वाटू लागल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता रोहित पवार भातखळकरांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत