‘त्या’ 6 नगरसेवकांना दिलासा; कोकण आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या हातचे बाहुले- मनसे

नवी मुंबई: रायगड माझा 

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेच्या गोटात दाखल झालेल्या ‘त्या’ सहा नगरसेवकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. कोकणचे आयुक्त जगदीश पाटील गैरहजर राहिल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

कोकण आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या हातचे बाहुले- मनसे

जगदीश पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली.

दरम्यान, नगरसेवक दिलीप लांडे यांच्या नेतृत्त्वात सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. ही बाब मनसेला चांगलीच झोंबली होती. याविरोधात मनसेने कोकण आयुक्तांकडे धाव घेतली होती. तीन महिन्यात हे प्रकरण निकाली निघणे अपेक्षीत होते. मात्र, कोकण आयुक्त सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या नगरसेवकांनी दिली मनसेला सोडचिठ्ठी…
दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत