थंड वाऱ्यामुळे मुंबईकर सुखावले!

मुंबई : रायगड माझा वृत्त

ऐन जानेवारीत उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर बुधवारी थंड वाऱ्यामुळे सुखावले. भर दुपारी मुंबईसह नजीकच्या परिसरात थंड वारे वाहत होते. कमाल तापमान कमी झाल्याने हा सुखद अनुभव आला. उत्तरेत थंडीचा जोर कायम असेपर्यंत मुंबईत असेच वातावरण राहील. आठवडाभर गुलाबी थंडीचा अनुभव येईल. शुक्रवारी किमान तापमान १७ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता असून थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत