थर्टी फर्स्टसाठी उरण पोलिसांचा चोख बंदोबस्त: तळीरामांवर करडी नजर

न्हावाशेवा : रायगड माझा वृत्त

थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उरण पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये विशेष करून तळीरामांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तालुक्यातील प्रत्येक दारूच्या दुकानासमोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विना परवाना दारू आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेउन उरण पोलिसांनी ही दक्षता घेतली आहे. उरण पोलिस ठाण्याचे दोन पोलीस निरिक्षक, आठ अधिकारी आणि पोलीस हे उद्या वेगवगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असतील अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

उरण तालुका हा निसर्गरम्य असून येथे मोठा समुद्र किनारा आहे. तर पूर्व भागात अनेक ठिकाणी मोठ मोठाले फार्म हाउस आहेत. त्यामुळे दरवर्षी मुंबई- नव्या मुंबईतून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या वर्षीही उरणमध्ये पर्यटक येण्याची शक्यता गृहीत धुरून पोलिसांनी उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनारा, दांडा समुद्र किनारा, नागाव समुद्र किनारा त्याच बरोबर या भागात असणारे फार्म हाउस, हॉटेल्स, रिसॉर्ट या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या साठी बीट मार्शलच्या तुकड्या, मोबाईल व्हॅन, साध्या वेशातील पोलीस तयार ठेवण्यात आले असून ते मोटारसायकल, व्हॅन इतर साधनाने गस्त घालतील तर काही ठिकाणी चेक पोस्ट द्वारे संशयित वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत