थिएटरमध्ये ‘ठाकरे’चे पोस्टर नसल्याने शिवसैनिकांचा राडा

वाशी : रायगड माझा वृत्त

नवी मुंबईतील वाशी येथील आयनॉक्स थिएटरमध्ये ‘ठाकरे’ चित्रपटाचे पोस्टर नसल्यामुळे शिवसैनिकांनी चित्रपटगृहात गोंधळ घातला. चित्रपटाचे पोस्टर का लावले नाही असा जाब विचारत शिवसैनिकांनी सकाळच्या वेळेस गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

आयनॉक्स चित्रपटगृहात आज सकाळी आठ वाजता ‘ठाकरे’ चित्रपटाचा शो होता. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी गर्दी केली होती. मात्र, या थिएटरमध्ये चित्रपटाचे पोस्टरच लावले नव्हते. त्यामुळे चित्रपटाच्या शोबाबत चित्रपट पाहण्यास आलेल्या शिवसैनिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. ‘ठाकरे’ शिवाय अन्य चित्रपटांचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. आयनॉक्सच्या परिसरात अन्य चित्रपटांप्रमाणे ठाकरे चित्रपटाचेदेखील पोस्ट लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी थांबवली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत