थेट सरपंच पदासाठी शेकापचे प्रवीण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नेरळ : कांता हाबळे

मानिवली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक 26 सप्टेंबर रोजी होत आहे. कर्जत तहसील कार्यालयात 5 सप्टेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवार दि.7 सप्टेंबर रोजी मानिवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

मानिवली ग्रामपंचायती मध्ये हुतात्मा हिराजी पाटील ग्रामविकास आघाडी कडून थेट सरपंच पदासाठी प्रवीण पाटील तर विभाग क्रमांक 1 मधून ज्ञानेश्वर शिंदे, मुक्ताबाई गायकर, तुकाराम मुकणे, नितीन गायकर, दुर्गाबाई काळेकर विभाग 2 मधून संकेत पाटील सारिका दुर्गे, शुभांगी झांजे, गायत्री झांजे तर विभाग 3 मधून तुषार गवळी, जयश्री गवळी, दीपा डायरे, रमेश गवळी, या उमेदवारांनी नामांकीत अर्ज दाखल केला आहे.
प्रवीण पाटील यांच्यावर विश्वास ठेवून आठवडा भरापूर्वी भाजप तसेच शिवसेने च्या अनेक तरुणांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याने मोठ्या तरुण वर्ग प्रवीण पाटील यांच्या सोबत असल्याने प्रवीण पाटील यांची ताकद वाढली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सकाळी अर्ज दाखल करताना मोठा तरुण वर्ग त्यांच्या सोबत होता. यावेळी समाजकल्याण सभापती नारायण डामसे, कृषीउत्पन्न समतीची चे उप सभापती जिकिरीया बुबेरे, राम राणे, नितेश शहा, प्रकाश फराट, पांडुरंग बदे, महेश म्हसे, रामचंद्र बदे आदी यावेळी उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत