दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

महाड : सिद्धांत कारेकर

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. रायगड जिल्ह्यातील महाडनजीक केंबुर्ली गावाजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दरड कोसळली. त्यामुळे कोकण आणि मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूला पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास चार तासांनी दरड हटवण्यात यश आले असून दोन्ही मार्गांवरील वाहतूक संथगतीने सुरु आहे.

मुंबई गोवा महामार्गावर केंबुर्ली नजीक दरड कोसळल्याने महामार्गावरील दोन्‍ही बाजूची वाहतूक ठप्‍प झाली आहे. वाहतूक वळवण्‍यासाठी जवळचा पर्यायी मार्ग नसल्‍याने महामार्गावर दोन्‍ही बाजूला वाहनांच्‍या लांबचलांब रांगा लागल्या. राष्‍ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी , अधिकारी तसेच वाहतूक पोलीस घटनास्‍थळी पोहोचले असून दरड हटवण्‍याचे पूर्ण झाले आहे.

सध्‍या मुंबई – गोवा महामार्गाच्‍या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्‍यासाठी मोठया प्रमाणावर डोंगर भागात खोदकाम सुरू आहे. हे काम करताना कोणतेही नियोजन नसल्‍याने वारंवार माती रस्‍त्‍यावर येत आहे. रात्री या भागात जोरदार पाऊस पडला असून या पार्श्वभूमीवर ही दरड कोसळली. दरड हटवण्यात आली असून पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत