दरवडा कुटुंबाला शासनाकडून चार लाखाची मदत,धनादेशाचे वाटप

नेरळ : अजय गायकवाड 
कर्जत तालुक्यातील मोग्रज येथील रहिवासी असलेले शेतकरी राघो आंबो दरवडा यांचा ओढ्यामधील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.त्यांचा मृत्यू नैसर्गिक आपत्ती मुळे झाला असल्याने शासनाकडून दरवडा कुटुंबाला मदत देण्यात आली.
मोग्रज येथे दरवडा यांच्या घरी जाऊन धनादेश वाटप करण्यात आले,त्यावेळी आमदार सुरेश लाड यांच्यासह तहसीलदार अविनाश कोष्टी,जेष्ठ कार्यकर्ते अशोक सावंत,तरुण कार्यकर्ते प्रमोद पिंगळे,भास्कर देसले,तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संजय भालेराव, मंडळ अधिकारी माणिक सानप,तलाठी शीतल मोरे,आदी उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत