दरीत कोसळून ट्रॅक्‍टर-ट्रॉलीचे तुकडे

चालकासह दोघे जागीच ठार

पाटण : रायगड माझा

तारळे विभागातील कोंजवडे-बेंदवाडी रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्‍टर-ट्रॉली 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ट्रॅक्‍टर चालकासह अन्य एकजण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री उशीरा घडली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्‍टर-ट्रॉली अक्षरश: तुकडे-तुकडे झाले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या या भीषण अपघातात विलास कराडे (वय 25) तर इराप्पा खरात (वय 26, रा. चिकुंडी करेवाडी ता. जत जि. सांगली) हे दोघेजण जागीच ठार झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत