दरोड्याच्या तयारीतील पाच जणांनाची टोळी पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर : रायगड माझा वृत्त

शहरातील पत्रकार चौकात मंगळवारी पोलीस वाहनाला कट मारून पळणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

The gang got ready for the robbery: Five people were arrested | दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली :पाच जणांना अटक
मिटके हे मंगळवारी शहरातून पथकासह पेट्रोलिंग करत होते. यावेळी पत्रकार चौकात त्यांच्या वाहनाला एक सिल्व्हर रंगाची टाटा इंडिगो व काळ्या रंगाची अ‍ॅक्टिवा मोटारसायकल कट मारून गेली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या कारचा पाठला करून त्यांना नगर-मनमाड रोडवरील कॉटेज कॉर्नरजवळ पकडले. यावेळी कारमधील अमोल राजू पटेकर (वय २१ रा. माका ता. नेवासा), संदिप दत्तू जंगले (वय २२ रा. बोल्हेगाव,नगर), अवधूत सोमनाथ साठे (वय २२ भिस्तबाग चौक,नगर), राकेश प्रकाश चौधरी (वय २६ रा. बोल्हेगाव, नगर) यांना तर मोटारसायकलवरील फरमान आसमोहंमद मलीक (वय २० रा. माळीवाडा, नगर) यांना ताब्यात घेतले़. यावेळी कारमध्ये एक चाकू, लोखंडी कटावणी, मिरचीपूड, चार मोबाईल, टॉवरमधील वाप-याच्या बॅट-या, दोन स्क्रूड्रायव्हर असा मुद्देमाल मिळून आला़ पाच जणांनी या बॅट-या चोरून आणलेल्या होत्या. या चोरट्यांनी या आधी श्रीगोंदा व एमआयडीसी परिसरात चो-या केल्याची कबुली दिली आहे. मंगळवारी ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप मिटके, सहाय्यक निरीक्षक पिंगळे, सहाय्यक फौजदार मंडलिक, कॉन्स्टेबल सुपेकर, गणेश चव्हाण, सचिन जाधव, वाघमारे, गिरवले, फसले, बारवकर, मिसाळ, हरूण शेख, सलिम शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत