दशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मॉकड्रील

पुणे : प्रतीक शुक्ल

कोरेगाव पार्क पुण्यातील या उच्चभ्रू वस्तीतील हॉटेल कॉनरेड चा गजबजलेला परिसर. अचानक या हॉटेल मध्ये दहशतवादी शिरल्याची बातमी येते आणि मग सुरु होते पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई. थोड्याच वेळात कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण होते आणि भांबावलेल्या नागरिकांना हे मॉकड्रील असल्याचे नंतर समजते.

देशात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जाते. या हल्ल्याचा संपूर्ण सामना करण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस दलात खास दहशतवाद विरोधी पथक तयार करण्यात आले आहे . खडतर प्रशिक्षणानंतर या  पथकाची तयारी जाणून घेण्यासाठी खास मॉकड्रील करण्यात आले. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के . व्यंकटेशम ,सह आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी या मॉकड्रिलला  मान्यता दिली . विशेष शाखेचे उपयुक्त अशोक मोराळे ,सहायक पोलीस आयुक्त राम  मांडुरके ,यांच्या मार्गदर्शनाखाली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहादरपुरे आणि जलद प्रतिसाद पथकाचे प्रभारी अधीकारी उपनिरीक्षक पावन पाटील यांनी हे मॉकड्रील पार पडले. जलद प्रतिसाद पथकाच्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांसह २० कमांडोज या मॉकड्रील मध्ये सहभागी झाले. यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापनाने देखील सहकार्य केले. या  मॉकड्रील मुले पोलिसांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत