दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रचाराचा उडाला धुरळा

उरण: महाराष्ट्र News 24 वृत्त 

उरण मतदारसंघात अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने दसºयाचा मुहूर्त साधून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत सेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी अशीच तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.

रॅली, मिरवणूक आणि थेट मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा धुरळा उडविला आहे. मतदार मात्र समस्या सोडविणाºया लोकप्रतिनिधीच्या शोधात असल्याचे दिसून येत आहेत. यापैकी काही उमेदवारांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रचारपत्रके, कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचवले आहेत. जेएनपीटी-बेलापूर दरम्यान दररोज होणाºया वाहतूककोंडीवर पाच वर्षांत तोडगा निघाला नाही. जनतेच्या विकासाऐवजी ठेकेदारीच्या कामातच अधिक रस दाखविणाºया भोईर यांना घोषणा करूनही १०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारता आले नाही. चार वेळा आमदारकी भोगलेल्या पाटील यांचा कार्यअहवाल, जाहीरनामा अद्याप मतदारांपर्यंत पोहोचवलेला नाही. त्यांच्या २० वर्षांपासून आमदारकीच्या काळात असलेल्या प्रलंबित समस्यांची स्थिती जैसे थे अशीच आहे. अपक्ष उमेदवार महेश बालदी एकेकाळी भाजपचे तर विद्यमान आमदार मनोहर भोईर सेनेचे असल्याने त्यांच्याकडे मतदार नाण्याच्याच दोन बाजू म्हणून पाहत आहेत. त्यामुळे या तीनही उमेदवारांना जनता निवडणुकीत नक्कीच जाब विचारतील, अशीच आजची स्थिती आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत