दस्तुरी नाक्यावरील पार्किंगला असणाऱ्या गाड्यांची तरुणांकडून तोडफोड! 

नेरळ : अजय गायकवाड 

माथेरान येथील दस्तुरी नाक्यावरील पार्किंगला असलेल्या वाहनांची तरुणांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेत पार्किंगला लावण्यात आलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वाहनांचे नुकसान केलेल्या चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला जाण्यासाठी दस्तुरी नाक्यावर वाहने पार्क करावी लागतात. याच दस्तुरी नाक्यावरून नेरळ माथेरान हि टॅक्सी सेवा देखील दिवसरात्र चालू असते. मात्र मंगळवारच्या रात्री पाच तरुणांनी दस्तुरी नाक्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड केली . यामध्ये दोन पर्यटकांच्या कार असून तिसरी नेरळ माथेरान चालणारी टॅक्सी आहे. या तरुणांनी पार्किंगला असणाऱ्या इंडिका कारच्या काचा फोडल्या, त्यानंतर नेरळ माथेरान टॅक्सी चालवणारे अनिल सुर्वे यांच्या टॅक्सीची काच फोडण्यात आली.

या तरुणांचं हे कृत्य चालू असतानाच वनविभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काचा फोडण्याच्या आवाज आला. त्यांनी लगेच बाहेर येऊन टॅक्सी चालकांना कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि टॅक्सी चालकांनी त्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यामध्ये चार तरुण त्यांच्या ताब्यात भेटले असून एकाने पळ काढलाय. राजेश पवार, सुरज पवार, अक्षय वाघमारे, ओंकार शिखरे अशी या तरुणांनाही नावे असून या तरुणांना अटक केली आहे.

या तरुणांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून असून त्यांच्याकडे असलेली सॅन्ट्रो कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. हे पाचही तरुण पिंपरी चिंचवड येथील असून हे कॉलेजचे शिक्षण घेत आहेत. या तरुणांनी असे कृत्य का केले याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत