दहावीचा निकाल जाहीर : राज्याचा निकाल 89.41 टक्के, दहावीतही मुलींचीच बाजी…

निकालात कोकणाची बाजी

दहावी व बारावी फेरपरिक्षा 17 जुलै पासून सुरू होणार

पुणे : रायगड माझा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 0.67 टक्क्याने वाढ झाली असून 89.41 टक्‍के निकाल लागला असल्याची माहिती राज्य बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. दरवर्षी प्रमाणेच यंदाही राज्यात मुलींच पुढे आहेत. यंदा पुणे विभागाला निकाल 92.08 टक्‍के लागला आहे.  मुलींचा निकाल 91.97 टक्के तर मुलांचा 87.27 टक्के लागला आहे. राज्यातील सुमारे 17 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

गुणपत्रिकेची मूळ प्रत संबंधित शाळांमध्ये वितरीत केली जाणार आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत राज्याचा यंदा दहावीचा निकाल 0.67 टक्‍क्‍यांनी वाढला असून तो 89.41 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा 96 टक्के निकाल लागला असून कोकणने अव्वल स्थान पटकावले आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 इतका टक्‍का लागला आहे.

मुलांचा निकाल 87.27 टक्के तर मुलींचा निकाल 91.97 टक्के
राज्यातून एकूण 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली त्यापैकी 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी पास झाले आहेत

निकालाची विभागीय टक्केवारी…

1)  कोकण : 96 टक्के
2)  कोल्हापूर : 93.88 टक्के
3)  पुणे : 92.08 टक्के
4)  मुंबई : 90.41 टक्के
5)  औरंगाबाद :  88.81 टक्के
6)  नाशिक : 87.42 टक्के
7)  अमरावती : 86.49 टक्के
8)  लातूर : 86.30 टक्के
9)  नागपूर :  85.97 टक्के
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत