दहावीची कलचाचणी आता सर्व भाषांमध्ये देता येणार

रायगड माझा वृत्त |पुणे

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी ही विद्यार्थ्यांना आपापल्या भाषांमध्ये देता येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता इंग्रजी बरोबरच, मराठी, हिंदी, तेलुगू, उर्दू, गुजराती व कन्नड भाषांमध्ये कलचाचणी देता येणार आहे. मात्र, आता विद्यार्थी अधिक व संगणक कमी अशी परिस्थिती उद्भवली म्हणून की काय दहावीची कलचाचणी शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी व रविवारीही घेण्यात याव्यात अशा सूचना राज्य मंडळाने शाळांना दिल्या आहेत.

या विद्यार्थ्यांची कलचाचणी दि.28 फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार आहे. ही चाचणी मंडळाच्या कलचाचणी http://kal18.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून ही प्रणाली डाऊनलोड करून घ्यावी, अशा सूचना मंडळाने केल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत