दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार …

जालना: गणेश जाधव 

दहा रुपयाचे नाणे अधिकृत असल्याचे आरबीआयने सांगितले आहे .  बाजारामध्ये चौदा प्रकारची नाणी आहेत.  दहा रुपयांची नाणी ना घेणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल असे आरबीआय ने सांगितले असताना  देखील दहा रुपयांची नाणी व्यवहारात अनेकदा नाकारली जातात .

जालना जिल्ह्यात अफवांमुळे दहा रुपयांचे नाणे चलनात  घेत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.  मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म चा पहिला अर्थसंकल्प सादर करताना त्यात नाणी चलनात असल्याची माहिती दिली.  याआधीच एक रुपयांच्या आणि दोन रुपयांची तसेच पाच आणि  दहा रुपयांची नाणी व्यवहारात आली , मात्र स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा वीस रुपयांचे  नाणे  येत आहे.  मात्र दहा रुपयांच्या नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा चांगलीच  वेगाने पसरत आहे.  त्यामुळे छोटे-मोठे दुकानदार रिक्षा चालक भाजीमंडीतील विक्रेते दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत असल्याने दहा रुपयांचे नाणे व्यवहारात आहे की नाही हाच प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत