दांड़वाड़ी कूटूंबाची पाण्यासाठी सहस्ञ पावलांची पायपीट.

खालापूर – मनोज कळमकर

खालापूर नगरपंचायत हद्दीतील दांड़वाड़ी आदिवासी कुटूंबाना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीचा आसरा घ्यावा लागत असून ड़ोक्यावर तीन हंड़े घेवून वाड़ीपासून हजार पावलांची पायपीट महिलांच्या पाचवीला पुजली आहे. खालापूर तालुका कायम टंचाईग्रस्ताच्या यादीत असून खालापूरातील अनेक गावे व वाड़्यांची पावसाळा संपला कि पाण्यासाठी ओढाताण होते.दांड़वाड़ी देखील पाण्याच्या दुष्टचक्रात अडकलेली असून वाड़ीलगत बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी असताना देखील पाणी योजना राबविण्यात ऊदासिनाता यामुळे कष्टकरी आदिवासी महिलांच्या नशीबी हंड़े घेवून विहिर गाठण्याची पाळी आली आहे. वाड़ीपासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरापेक्षा दूर असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागते. दिवसभर मजूरीवर जायचे आणि त्यानंतर पाण्यासाठी वणवण करावे यामुळे दांड़वाड़ीतील महिला ञासल्या आहेत.मार्चनंतर विहिर देखील कोरडी पड़त असल्यामुळे एखादा ड़वरा(ड़ोंगरातून वाहत आलेले नैसर्गिक रित्या खड्ड्यात जमा होण्याचे ठिकाण) शोधून मिळेल तेवढे पाणी गोळा करून कूटूंबाची तहान भागवणची वेळ दांड़वाड़ी आदिवासी वाड़ीवर येते.दांड़वाड़ी लगत करोडो रूपये गुंतवूकिचे गृहप्रकल्प येत असून आसपासच्या भागाचा विकास होत असताना दांड़वाड़ी कूटूंबाच्या नशिबी माञ पाण्यासाठी फरफट आहे.

खालापूरातील सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ यांनी पाच वर्षापूर्वी स्वखर्चातून दांड़वाड़ीसाठी पाताळगंगा नदिवरून पाणी पुरवठा योजना राबवली होती.आमदार सुरेश लाड़ यांचे हस्ते मोटरसुरू करून पाणीपुरवठा योजनेचे उद्धघाटन झाले होते.परंतु त्यानंतर काहि महिन्यात खाजगी जागेतून जलवाहिनीच्या मुद्द्यावरून पाणीपुरवठा बंद झाला तो आजतागायत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत