दाऊदचा सर्वात विश्वासू सहकारी जबीर मोती याला अटक!

रायगड माझा ऑनलाईन |

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या जबीर मोती याला अटक करण्यात आली आहे. लंडनमधून त्याला अटक करण्यात आली. दाऊदचा उजवा हात अशीही त्याची ओळख आहे. तो डी-कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचा प्रमुख मानला जातो. पाकिस्तानने त्याला नागरिकत्व बहाल केलं आहे. भारतासाठी हे मोठं यश मानलं जात आहे. जबीर मोती आणि दाऊदची पत्नी महजबीन, मुलगी महरीन आणि जावई जुनैद यांच्यातल्या आर्थिक देवाणघेवाणीच्या चौकशीनंतर जबीरवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे.

लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी जबीर मोती याला शुक्रवारी हिल्टन हॉटेलमधून अटक केली. पाकिस्तानी नागरिक असलेला जबीर १० वर्षांच्या व्हिसावर इंग्लंडमध्ये राहत होता. इंग्लंड, यूएई आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या दाऊदच्या काळ्या कारभारावर लक्ष ठेवण्याचं काम मोती करतो. तो दाऊद आणि डी कंपनीसाठी पैशासंबंधित व्यवहारही पाहतो.  बनावट भारतीय नोटा, अवैध शस्त्रास्त्रं पुरवठा आणि मालमत्तेसंबंधित व्यवहारावर लक्ष ठेवण्याचं कामही त्याच्याकडे होतं, अशी माहिती आहे.  मोतीवर ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि इतर गुन्हांमध्ये गंभीर आरोप आहेत. पैशांचा पुरवठा दहशतवादी संघटनांपर्यंत करण्याचं काम मोती याच्या कडे होतं असं सांगितलं जात आहे.

दाऊदवरील फास आवळण्यासाठी भारताकडून जबीर मोतीवर कारवाईची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत