दादर स्थानकात महिलेचा विनयभंग

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकात एका महिलेचा एका पुरुषाने विनयभंग केला. २५ ऑगस्ट रोजी रात्री ९.४० वाजता ही घटना घडली. ही महिला आपल्या आई आणि बहिणीसोबत प्लॅटफॉर्मवर उभी होती, तितक्यात तिथे आरोपी आला आणि त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, तिने त्याला हटकले तेव्हा त्याने चाकू काढला आणि तिला आणि सहप्रवाशांना मारण्याची धमकी दिली. त्याला पोलिसांनी अटक केली.

ही महिला नालासोपारा येथे राहते. ती २५ ऑगस्टला तिच्या आई आणि बहिणीसोबत चेंबूरला गेली होती. घरी परतण्यासाठी त्यांनी चेंबूरहून कुर्ला-दादर असा प्रवास करत दादर स्थानक गाठले. प्लॅटफॉर्म क्र. ३ वर त्या तिघी विरार ट्रेनची वाट पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात आरोपी तेथे आला आणि त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तिने त्याला हटकले तशी त्याने तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. इतर महिला प्रवाशांनी हा प्रकार पाहताच त्याला मारायला सुरुवात केली, तेव्हा त्याने चाकू काढला आणि त्यांना धमकावू लागला. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याला पकडले, अशी माहिती मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धीवर यांनी दिली. वर्गीस डिसोझा (३९) असं या आरोपीचं नाव आहे. तो धारावीत राहतो. त्याच्यावर याआधीही मारहाण, दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत