‘दादा मी प्रेग्नंट आहे’, मुंबई-पुण्यात विचित्र होर्डींग

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबई आणि पुण्यातील एक होर्डिंग्स सध्या प्रत्येक नागरिकाचे लक्ष वेधून घेत आहे. दादरमधील प्रभादेवी आणि पुण्यातील कर्वेरोड येथील डेक्कन टी पॉईंट येथे लावण्यात आलेल्या या होर्डिग्समुळे नागरिकांची उत्सुकता मात्र वाढली आहे. या होर्डिंगवर ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ असे लिहिण्यात आलेले आहे, त्यामुळे नागरिकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. या होर्डिग्समागे का उद्देश असावा अशी चर्चा सुरू आहे. काहींनी हे होर्डिंग्स कलाविश्वाशी संबंधित असावं अशी शक्य़ता व्यक्त केली आहे.

याआधी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचे ‘कार्ड मिला क्या’ नावाने होर्डिंग्स लागले होते आणि या होर्डिग्सनंतर लगेचच कोटक महिंद्राने एक कार्ड बाजारात आणले. हे एक व्यावसायिक होर्डिग्स होते. याशिवाय पुण्यात ‘शिवडे आय एम सॉरी’ या नावाचे देखील 400 होर्डिग्स लावण्यात आले होते. हा सर्वकाही प्रमोशनचा भाग असावा आणि लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यासाठी हे सर्व सुरू असावं अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत