दानवे-खोतकर वादामध्ये मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

raosaheb-danve-and-arjun-khotkar

जालना : रायगड माझा वृत्त

आपल्याला एकत्र राहून खूप गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे दोन भावंडांमध्ये होणारे वाद हे घरातच थोपवायचे असतात. हा वाद मिटविण्यासाठी मी प्रयत्न करीन, अशी मध्यस्थी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील ‘दानवे-खोतकर’ यांच्यातील वादावर भूमिका मांडली.

येथील ‘महापशुधन एक्‍स्पो’च्या समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. सध्या जालना जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या राजकीय संघर्षाची जोरदार चर्चा आहे. हा राजकीय संघर्ष मिटविण्यासाठी आता आपण मध्यस्थी करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर कार्यक्रमात बोलले. आपल्याला एकत्र खूप गोष्टी करायच्या आहेत. आपण एकत्र आहोत. आपल्या घरात वादविवाद होत असतात. तसे दोन भावंडांतही वाद होणारच. हे वाद घरातच थोपवायचे असतात. तुमची इच्छा असेल तर सर्वांनी एकत्र बसावं, हा वाद मिटविण्यासाठी मी प्रयत्न करीन, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

तर, भाजपचे पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, की दोघांच्या राजकीय वादाबाबत असलेली शंका लोकांनी दूर करावी, मुख्यमंत्री यातून निश्‍चित मार्ग काढतील. आम्ही ३०-३२ वर्षे एकत्र आहोत, असेही ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत