दिघी पोर्ट प्रशासना विरूदध शकडो शिवसैनिक रस्त्यावर!

म्हसळा : निकेश कोकचा

श्रीवर्धन तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिघीपोर्ट तर्फे नागरी वाहतुकीच्या रस्त्यावरून नेहमीच बेकायदेशीर व अवजड वाहतूक केली जाते.या वाहतुकीमुळे म्हसळा शहरासहीत दिघी -माणगाव राज्य मार्गाची दुरावास्ता झाली असून ते रस्ते तत्काळ दुरुस्त करावे व रस्ते दुरुस्त होईपर्यंत दिघी पोर्टची एकही गाड़ी या रस्त्यावर दिसली नाही पाहीजे यासाठी आज शेकडो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन दिघी पोर्ट व प्रशासनाविरूदध् आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख रवी मुंढे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, श्रेत्र संघटक रविंद्र लाड, माणगाव तालुकाप्रमुख अनिल नवगणे, श्रीवर्धन तालुकाप्रमुख प्रतोष कोलथलकर, म्हसळा तालुकाप्रमुख नंदु शिर्के, अवजड वाहतुक तालुका प्रमुख श्याम कांबळे, दिपल शिर्के, उप तालुकाप्रमुख भाई कांबळे,युवासेना तालुका अधिकारी अमित महामुणकर, प्रसन्ना निजामपुरकर, महिला प्रमुख रिमाताई महामुणकर, उपशहरप्रमुख अक्रम साने, संतोष सुर्वे, महेश पाटील यांच्या साहित शेकडो शिवसैनिक व माहिल कार्यकर्त्या उपस्थित होते.

स्थानिक प्रशासन हे दिघी पोर्टच्या कलंत्री कडे विकले गेल्याने त्याना रस्त्यावरील तलावा एवढे मोठे व जिवघेणे खड्डे दिसत नाहीत. खडयामध्ये पडून अनेकांना अपंगत्व आले आहे तर काही जण मरण देखील पावले आहेत. रस्त्याबाबत एवढी गंभीर बाब असताना देखील झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी व जनतेच्या हितासाठी आज शिवसेनेला अंदोलन करावे लागेल आसल्याचे मत जिल्हाप्रमुख रवी मुंढे यांनि मांडले. प्रशासनाला जिवघेण्या दिघी पोर्ट मुळे पडलेल्या रस्त्यावरिल खंड्या बाबत वारंवार पत्राद्वारे सुचित करूण देखील कोणतीही दखल घेतली गेली नाही. प्रशासन नेमक कुणाच काम करते हे जनतेल समजल असल्याची टिका तालुकाप्रमुख नंदु शिर्के यांनी या आंदोलनाच्या वेळी केली. अंदोलनासाठी जमा झालेल्या शेकडो शिवसैनिकांनी दिघी पोर्ट व प्रशासना विरोधात मोठया प्रमाणात घोषणाबाजी केली.

दिघी माणगाव राज्य मार्गचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीचे चालले आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मोठया प्रमाणात मातीचा वापर होत आहे. या रस्त्याला दोन्ही बाजुने खोदले गेल्यान मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. प्रशासनाने कंत्राटदार जे.एम. म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल करूण कंत्राट रद्द करावा

-रवी मुंढे, दक्षिण जिल्हाप्रमुख शिवसेना

 

शिवसेनेने आज एका दिवसासाठी आंदोलन केले नसून आजपासुन आंदोलनाला सुरवात झाली आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी . प्रशासनाने बेकायदेशीर दिघी पोर्ट व ठेकेदारा विरुद्ध कारवाई न केल्यास शिवसेना रोज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल

– नंदु शिर्के, तालुकाप्रमुख

 

सोशल मिडीयावर रस्त्यावरुण सेना – राष्ट्रवादीमध्ये झुंपली

शिवसेनेच्या आंदोलनावर राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाजीम हसवारे यांनी सोशल मिडीयावर टिका केली होती. टिकेला उत्तर देताना नंदु शिर्के यांनी नाझीम हसवारे दिघी पोर्टचे ठेकेदार आहेत व त्यांच्या मुळेच हा रस्ता खडयात गेल्याची टिका एका विडीयोमधून केली. यामुळे काही काळ दोघांची सोशल मिडीयावर झुंपलेली पहावयास मिळाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत