दिघी सागरी पोलिस ठाण्यात 72 वा  स्वातंत्रदिन उत्साहात साजरा!

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलिस ठाण्यात देशाचा 72 व स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक धर्मराज  सोनके यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपनिरीक्षक पराग लोंढे,संदीप चव्हाण,निलेश सोनावने,राहुलगायकवाड,नवनाथ म्हात्रे,सागर गायकवाड,जागडे बापु,सचिन येरुणकर,जाधव,सौ चव्हाण म्याडम  व कर्मचारी, होमगार्ड यांची उपस्थिती होती.

स्वातंत्रदिनी निमित्ताने सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र भेटण्याची वेळ वर्षातून एकदा येत असते त्यामुळे तो उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होता. नुकत्याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. स्वातंत्रदिनी एकत्र आल्यावर सर्वांची आणखी ओळख झाल्याची प्रतिक्रिया येथील कर्मचाऱ्यांनी दिली. अधिकारी व कर्मचारी यांनी एकमेकांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बदली होऊन आलेले नवनियुक्त कर्मचारी व अधिकारी सर्वच कर्तव्यदक्ष आहेत शिवाय सर्वांची आदराने वागणारे अशी कौतुकाची थांब सहा पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी दिली. पोलिस ठाण्यात बोर्लीपंचतन परिसरातील शाळांतील विद्यार्थी भेट देतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.