दिघी सागरी पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची सभा

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

आगामी गणपती, दहीहंडी, दुर्गा देवी उत्सव आदी सणांच्या पार्श्‍वभूमीवर  श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस  स्टेशनच्या वतीने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहा पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके होते.

दिघी सागरी पोलीस ठाण्यात झालेल्या या सभेत शांतता व् मोहल्ला कमिटी तसेच सार्वजानिक गणेशोत्सवचे पदाधिकारी व् स्थानिक नेते आदी उपस्थित होते. पोलीस स्टेशन ची पोलीस अधिकारी सोनके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारचा वाद विवाद न करता, हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सण साजरे करावे, असे आवाहन श्री सोनके यांनी केले.  सार्वजानिक गणेशोत्सव मंडळानी रस्त्यावर मंडप घालू नये, मिरवणुकीत डीजेचा वापर करून वयस्कर नागरिकांचा त्रास टाळावा, गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवकांची व्यवस्था करावी व परवानगीशिवाय सार्वजानिक कार्यक्रम करू नये या सूचना न पाळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहा पोलीस निरिक्षक सोनके यानी मार्गदर्शन करताना सांगितले. गणेशोत्सव शांततेत पार पाडू, अशी ग्वाही उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.

सभापती मीना गाणेकर, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अफजल मेमन,दिवेआगर सरपंच उदय बापट बोर्लीपंचतन सरपंच गणेश पाटील,दांडगुरी सरपंच गजानन पाटील,शामकांत भोकरे,पोलिस पाटील गायत्री शेलार,दिलीप नाक्ती,रत्नाकर पाटील,रामचंद्र वाघे,भास्कर चोगले,मंदार तोडणकर,चंद्रकांत बिराडी,बबन सुर्वे,चंद्रकांत तोडणकर,व हिंदु मुस्लिम बांधव आदींची उपस्थिती होते.सभा संपन्न करण्यासाठी पोलिस कर्मचारी निलेश सोनावणे,राहुल गायकवाड,संतोष जाधव,नवनाथ म्हात्रे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी  मेहनत घेऊन सभा संपन्न झाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत