दिलासा फाऊंङेशन रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

खालापूर – मनोज कळमकर

दिलासा फाऊंङेशन खालापूरने ” रस्ता सुरक्षा अभियान” “अपघात मुक्त जीवन” अभियानाची सुरवात केली असून खालापूर शहरात धोक्याची सूचना फलक(हॅजार्ङ रिफ्लेक्टर्स) बसविण्याचा उपक्रम राबविला


गुरूवारी दिलासा फाऊंङेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खालापूर नगरपंचायत नगराध्यक्ष दिपक नाईक,उपनगराध्यक्षा शिवानी जंगम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पथकाचे प्रमुख गुरूनाथ साठेलकर,सदस्य शेखर जांभळे, पूजा साठेलकर ,स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश गवारी,शिक्षक श्रीकांत कोकणी,सामाजिक कार्यकर्ते दिनकर भुजबळ, पोलीस कर्मचारी निलेश कांबळे आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला.

 खालापूर शहरातून सावरोली मार्गे पेण,पाली आणि द्रूतगती मार्गा करिता रस्ता जातो.हा रस्ता  अवजङ वाहतुक,सतत वाहनांची गर्दीने  व्यस्त असतो.या मार्गावर बसस्थानक,सरकारी कार्यालये,शाळा आहेत.त्यामुळे अपघाताची कायम भीती असते.शहरातून एकेरी वाहतुक असेन जिथे दुभाजक सुरू होतात तिथे कोणताहि सूचना फलक नसल्याने  ओव्हरटेक करणारी वाहन अनेकदा दुभाजकावर आदळून अपघात होतात.विशेषतः अंधारात वाहन चालकांना दुभाजकांचा अंदाज येत नसल्याने राञी अनेक अपघात घङले होते.  दिलासा फाऊंङेशन खालापूर यांनी पुढाकार घेत धोक्याची सूचना देणारे फलक (हॅजार्ङ रिफ्लेक्टर् )तयार केले आहेत. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पथकाने धोक्याच्या सूचना देणारे फलकाचे अनावरण केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत