दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी; नगराध्यक्षांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

महाराष्ट्र News 24

माथेरानचे जेष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र न्यूज 24 चे संपादक दिवंगत संतोष पवार यांचे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन 9 सप्टेंबर रोजी आकस्मिक मृत्य झाला होता. त्यांना शासकीय मदत मिळावी या करिता 15 ऑक्टोबर रोजी माथेरानच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा प्रसाद सावंत आणि माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची त्यांच्या शासकीय “जेतवन” या मलबार हिल येथील बंगल्यावर भेट घेतली.

या वेळेस त्यांना नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन दिले. त्यावर त्यांनी महाराष्ट्र शासनास प्रस्ताव पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांना सूचना केल्या आहेत. तसेच माथेरान येथील हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी देखीलआरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. या विषयाला अनुसरून त्यांनी माथेरान च्या रुग्णालयाला  Bi-pap/C-pap मशीन आणि एक डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रायगड यांना केल्या असून माथेरान नगरपरिषदेच्या बी. जे. रुग्णालयात त्याची लवकरच पूर्तता केली जाण्याची शक्यता आहे. या वेळेस माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी तसेच गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसास सावंत उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत