दिवसा टॅक्सी चालवायचा; रात्री घरफोड्या करायचा

मुंबई : रायगड माझा वृत्त

दिवसा टॅक्सी चालवून रात्री घरफोड्या करणाऱ्या सराईत चोराला दादर पोलिसांनी अटक केली. वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या चालकाने त्याच परिसरातील घरांना लक्ष्य केले होते. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून सात गुन्हे उघडकीस आणले आहेत.

मध्यरात्री दोन ते पहाटे पाचच्या दरम्यान वरळी कोळीवाडय़ात घरफोडीचे गुन्हे अधूनमधून घडत होते पण चोर कोण याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय करणकोट, अंमलदार खामकर, पाटणे, तांबकर, रावराणे, निकम, राठोड हे पथक आरोपीचा कसून शोध घेत होते. पोलिसांनी खबऱयांचे जाळे पसरवून कोळीवाडय़ात वॉच ठेवला होता पण टॅक्सीचालक शैलेशकुमार यादव ऊर्फ लल्लन (43) हा पद्धतशीर संधी साधून घरफोडय़ा करत होता. अखेर कोळीवाडय़ात राहणारा यादव टॅक्सीचालक हाच घरफोडय़ा करीत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी यादवला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर नोव्हेंबर 2017 पासून कोळीवाडय़ात सर्व घरफोडय़ा केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी सात गुह्यांची उकल करून चार गुह्यांतील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यादवच्या अटकेमुळे कोळीवाडय़ातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मौजमजेसाठी चोरी
शैलेशकुमार विवाहित असून भाड्याने टॅक्सी चालवतो. यापूर्वी तो चोऱ्या करायचा. त्याला अटकदेखील झाली होती. त्या गुह्यांतून सुटल्यानंतर यादव शांत झाला. टॅक्सी चालवायला लागला. पण नोव्हेंबर 2017 पासून यादवने पुन्हा घरफोडय़ा करायला सुरुवात केली. कोळीवाडय़ातच राहत असल्याने त्याच्यावर कोणाचा संशय येत नव्हता. चोरी करण्यासाठी त्याने रात्री दोन ते पहाटे पाचची वेळ निवडली होती. चोरीचा ऐवज विकून तो आपली हौस पूर्ण करायचा असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत