दिवसा मोलमजुरी आणि रात्री घरफोडी

चाळीसगाव : रायगड माझा वृत्त

सायगाव( ता.चाळीसगाव) येथे दोन महीन्यापुर्वी दोन ठीकाणी  घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीच्या मेहुणबारे पोलिसांनी वेहळगाव( ता.नांदगाव) येथुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संशयित आरोपी यांच्या कडुन अजुन काही घरफोडी केल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत असुन लवकरच या टोळीतील बाकी  साथीदारांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सायगाव (ता.चाळीसगाव) येथील रहिवाशी असलेल्या विठाबाई दगा साबळे याच्याकडे गेल्या दोन महीन्यापुर्वी अज्ञात चोरटय़ांनी लाकडी दरवाजाच्या कडीकोयंडा तोडुन घरातील लोखंडाच्या पेटीत ठेवलेले 52 हजार रूपये किमतीचे सोन्या, चांदिचे दागिने तर दोन लाख रुपये रोख आसा अडीच लाखाचा ऐवज लंपास केला होता. विठाबाई साबळे यांनी मेंढ्या विक्री करून शेतमालाचे उत्पन्न असे सुमारे दोन लाख रुपये लोखंडी पेटीत ठेवले होते.यानंतर त्यांच्या घरा शेजारी इसेखाॅ पठाण यांच्या घरी देखील लोखंडी पेटीतून पाच हजार रुपये लांबविले यानंतर मेहुणबारे पोलिस या घरफोडी करणाऱ्याच्यां मागावर गेल्या दोन महीन्यापासुन होते.या प्रकरणातील संशयिताची गुप्त माहिती मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.संशयीत आरोपीला अटक करण्यासाठी एक पथक तयार केले.

नांदगाव तालुक्यातुन अटक
सायगाव येथील घरफोडीचा संशयित आरोपी वाल्मिक बारकु पाटील (वय32) हा गावातीलच  असल्याचे श्री.हीरे यांना कळाले. या पदकात पोलिस हवालदार छबुलाल नागरे,मिलींद शिंदे, योगेश मांडोळे, गोरक चकोर शैलेश माळी यांनी काल (ता.12) रोजी संशयित वाल्मिक पाटील हा वेहळगाव( ता.नांदगाव)येथे नितीन घुगे यांच्या विहिरीच्या कामावर होता त्याला  दुपारी बाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीसाठी मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले.सुरवातीला त्यांने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलु लागला व त्यांने गुन्ह्य़ाची कबुली दिली.त्याला चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.दरम्यान या आरोपीने दोन वर्षापुर्वी सायगाव येथील दत्त मंदिरातील दान पेटी फोडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिवसा काम रात्रीची चोरी
मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा वाल्मिक पाटील हा दिवसाला काम व रात्रीची चोरी करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्याच्यासोबत या  कामात अजुन काहीजण आहेत का याचा तपास सध्या तरी पोलिस घेत आहेत. यामुळे या प्रकरणात महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.काही दिवसापुर्वी तळोंदा प्र.दे.येथेही घरफोडय़ा  झाल्या होत्या.यामुळे हे गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून चौकशीअंती त्यांने घरातील लाॅककर मधुन  आठ हजार पाचशे रुपये काढुन दिले. या प्रकरणात अजुन काही संशयीत लवकरच अटक केले जातील
– जयपाल हिरे, साहाय्यक पोलिस निरीक्षक मेहुणबारे (ता.चाळीसगाव)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत