दिवाळीच्या मुहूर्तावर लोकलमध्ये इंटरनेटविना मनोरंजन

मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त 

‘घाटकोपर-विक्रोळी दरम्यान इंटरनेटला रेंज नसणे’, ‘ऑनलाइन कार्यक्रम पाहताना पारसिक बोगद्यात ‘बफरचा’ सामना करावा लागणे’, या त्रासापासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. अनेक वेळा लोकल प्रवास करताना इंटरनेटच्या समस्या उद्भवतात. यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडते.

इंटरनेटविना मनोरंजन करण्यासाठी मध्य रेल्वेने ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेतला. या सुविधेमुळे तांत्रिक बिघाड, मेल-एक्स्प्रेसला जाण्यासाठी लोकल थांबवणे अशा त्रासामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना काहीअंशी नक्कीच समाधान मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या लोकलमध्ये वायफाय बसविण्याचे काम सुरू आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या सुविधांचा प्रवाशांना लाभ घेता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत