दिव्यांग तरुणाचा विधानभवनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; मोठा अनर्थ टळला

नागपूर:रायगड माझा वृत्त 

  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरले असताना एका दिव्यांग तरुणाने विधानभवनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी त्याच्या अंगावर तात्काळ पाणी टाकून त्याला ताब्यात घेतले आहे. आशिष आमदरे असे या तरुणाचे नाव आहे.

ओसीडब्ल्यु पाणीपुरवठा करणार्‍या एका ट्रकने काही दिवसापूर्वी आशिष आमदरे याला धडक दिली होती. याप्रकरणी त्याने ओसीडब्ल्यू आणि पोलिसांत तक्रार दिली होती. परंतु त्याची तक्रारीची दखल कोणीही घेतली नाही. विशेष म्हणजे त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही आशिषने तक्रार केली होती. मात्र, त्याचाही काही एक उपयोग झाला नाही. यामुळे या सगळ्या प्रकारामुळे आशिषला चांगलाच मनस्ताप झाला. याचा निषेध करण्‍यासाठी आशिषने विधानभवनासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आशिषने यापूर्वी मुख्यमंत्री सचिवालय नोकरी मिळत नाही, म्हणून आंदोलन केले होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विधानभवनासमोर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. प्रकाश बर्डे या कर्मचाऱ्याचे नाव असून महापालिकेने पुन्हा सेवेत घ्यावे, अशी त्याची मागणी आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत