दिव्यांग बचत गटाच्या टी स्टॉल वडापाव सेंटरचे उद्घाटन

रायगड : अमूलकुमार जैन (प्रतिनिधी)

सुधागड तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्या प्रेरणेने साई – सखा दिव्यांग बचत गटाच्या माध्यमातून वडापाव व ती स्टॉल सुरु केला आहे. त्याचे उद्घाटन सुधागड तहसीलदार दिलीप आयन वार, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांच्या उपस्थितीत सुधागड येथे पार पडला. बचत गटाच्या या स्टॉल मुळे चार दिव्यांगांना रोजगार मिळणार आहे.

या याप्रसंगी तहसीलदार आयन वार यांनी दिव्यांगाने स्वतःच्या पायावर उभे राहावे प्रशासनाकडून सहकार्य आम्ही करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमास शैलेश सोनकर, बाबासाहेब देशमुख लोखंडे, अनिल जोशी, वैभव पिंगळे, अशोक दाभाडे, दिलीप जोशी, सखाराम कुडपणे, आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांचे सर्व दिव्यांग कडून कौतुक होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत