दीड महिन्याच्या मुलासह रुळांवर झोपली महिला; रेल्वे गेली, पण ओरखडाही नाही

 

रायगड माझा वृत्त 

बुऱ्हाणपूर/ नेपानगर – अलाहाबादची एक महिला शनिवारी गोरखपूर एलटीटी काशी एक्स्प्रेसने मुंबईला जात होती. अचानक ती मध्य प्रदेशातील नेपानगर रेल्वे स्थानकावर उतरली. आणि दीड महिन्याच्या मुलाला छातीला कवटाळून रेल्वे रुळांवर झोपली. तेवढ्यात समोरून पुष्पक एक्स्प्रेस ताशी १०० च्या वेगाने त्या महिलेच्या अंगावरून गेली.

लोकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. पण महिलेला साधा ओरखडाही उमटला नाही. दोघेही बालंबाल बचावले. नेपानगरला पुष्पक एक्स्प्रेसचा थांबा नाही. त्यामुळे रेल्वे ताशी १०० च्या वेगाने जाते. ही घटना पाहताच लोकांमध्ये धावपळ सुरू झाली. रेल्वे निघून गेल्यानंतर स्टेशनवरील प्रवाशी, जीआरपी व रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे धाव घेतली. ती जिवंत असल्याचे पाहून लोकांना विश्वासच बसला नाही. या महिलेचे नाव तबस्सुम (२५) असून पती महंमद साजेद याने तिला तलाक दिला होता. त्यामुळे ती तणावाखाली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत