दीपिका पादुकोण अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार

मुंबई :रायगड माझा ऑनलाईन 

अॅसिड हल्ल्याच्या खुणा चेहऱ्यावर कायम असल्या तरी आत्मविश्वासाच्या जोरावर आज लक्ष्मी अग्रवाल आज एका फॅशन ब्रॅन्डचा चेहरा बनलीय. स्वत: अॅसिड हल्ला पीडित असूनही हिंमत न हारता ती आयुष्‍य जगतेय आणि अशा हल्‍ल्‍यांविरोधात ती आवाज उठवतेय.

आता लक्ष्‍मीचं आयुष्‍य मोठ्‍या पडद्‍यावर दिसावं म्‍हणून मेघना गुलजार चित्रपट आणत आहेत. एका इंग्‍लिश वृत्तपत्राच्‍या माहितीनुसार, दीपिका पादुकोण मेघना गुलजार यांच्‍या आगामी चित्रपटात दिसणार असून ती लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं टायटल अद्‍याप गुलदस्‍त्‍यात ठेवण्‍यात आलं आहे.

या चित्रपटाबाबत दीपिका म्‍हणाली, ‘ज्‍यावेळी मी कहाणी ऐकली, त्‍यावेळी माझं मनं हेलावलं. कारण, ही फक्‍त हिंसाच नाही तर शक्‍ती, धाडस, आशा आणि यशाची कहाणी आहे. लक्ष्मीच्‍या कहाणीने मला प्रभावित केलं आणि मी हा चित्रपट करायला तयार झाले.’

लक्ष्‍मीला मदतीचा हात 

लक्ष्मी ही दिल्लीच्‍या लक्ष्मी नगरात राहते. ती तिचा लिव्‍ह-इन बॉयफ्रेंड आलोक दीक्षितशी वेगळी झाली आहे. तिच्‍यावर झालेल्‍या ॲसिड हल्‍ल्‍यामुळे तिच्‍याकडे आपला उदरनिर्वाह करण्‍यासाठी नोकरी नव्‍हती. लक्ष्‍मी बरेच दिवस नोकरीच्‍या शोधात होती. परंतु, तिला नोकरी मिळत नव्‍हती. एका वृत्तपत्राने तिचं दु:ख, व्‍यथा मांडल्‍यानंतर अनेकजण तिच्‍या मदतीसाठी धावले. अभिनेता अक्षय कुमारने देखील तिला मदतीचा हात दिला होता. तसेच वृत्तपत्रातून आलेले लक्ष्‍मीबद्‍दलचे वृत्त पाहून अनेक कंपन्‍यांनी लक्ष्मीला नोकरीची ऑफर दिली.

मिशेल ओबामांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार  

ॲसिड हल्‍ल्‍यानंतर लक्ष्‍मीने हिम्मत हारली नाही. ती आज ‘स्टॉप ॲसिड अॅटॅक’ नावाने अभियान चालवते. लक्ष्मीला २०१४ मध्‍ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्‍या पत्नी मिशेल ओबामा यांच्‍या हस्‍ते International Women of Courage Award मिळाला होता. त्‍याचबरोबर लक्ष्मीने २०१६ मध्‍ये लंडन फॅशन वीकमध्‍ये सहभाग घेतला होता. तिने अनेक टीव्‍ही आणि वेब शोज देखील केले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत