दीपिका रणवीरचे लग्न मायदेशातच!

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन

Image result for ranveer singh and deepika padukone

सेलिब्रेटिजमध्ये सध्या वेडिंग डेस्टिनेशनच वेड सुरू आहे. विरूष्का नंतर दीपिका आणि रणवीरदेखील इटलीमध्ये विवाह करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण, या दोघांच्या चाहत्यांसाठी खुशखबर. कारण या दोघांचे लग्न मायदेशातच होणार असल्याचे वृत्त मिळाले आहे.

दोन दिवसापूर्वीत दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर लग्नाची पत्रिका शेअर करून चाहत्यांना निमंत्रण दिले आहे.  मात्र तिच्या पत्रिकेच विवाहच्या स्थळाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ही दोघे इटली येथे विवाह करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दीपिका आणि रणवीर या दोघांचा विवाहसोहळा मायदेशातच पार पडणार असल्याचे सांगितले आहे.

डेस्टीनेशन बदल करण्यामागचे कारण, दोन्ही परिवारामधील काही नातेवाईकांना इटलीचा प्रवास करण्यास अडचण येत होती. संगीत, मेहंदी, विवाह सोहळा आणि  रिसेप्शन  हे सर्व कार्यक्रम मुंबईमध्येच होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या दोघांचे रिसेप्शन मुंबईसोबत बेंगळुरमध्ये होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत