दुग्धाभिषेकाने नाशिकला शेतकरी संपाला सुरवात

नाशिक : रायगड माझा वृत्त 

शेतमालाला भाव व संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी दहा दिवसांच्या  शेतकरी संपाला आज सुरूवात झाली . निफाडमध्ये, येवला, नांदगावसह विविध भागातील शेतक-यांनी त्यात उस्फूर्त सहभागी होत ठिकठिकाणी दूध ओतून पुरवठा विस्कळीत केला. त्यामुळे संपाची सुरवात जोरात झाली.

राज्यातल्या शेतक-यांनी १ जुनपासून संपाची हाक दिली आहे.हा संप यशस्वी करण्याचा निर्धार सर्व संघटना,शेतकरी व नेत्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या  मालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव नसणे, केंद्राचे सर्वच शेतमालाबद्दलचे शेतक-यांचे नुकसान करणारे आयात निर्यात धोरण, व्यापारी, उद्योगपती, कारखाने, कंपन्यांना पोषक  शासकीय धोरण, प्रत्येक क्षेत्रातले अनाठायी राजकीयकरण,शेती आणि शेतकर्याबद्दलचा सरकार, प्रशासनाची उदासीनता यासाठी हा संप आहे, असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले .

देशातील 133 शेतकरी संघटनांनी  हा संप पुकारला आहे. निफाड येथे शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी दूधाचा पुरवठा विस्कळीत केला. शहरांना जाणारे दूध रस्त्यावर तसेच नदीत ओतले. संगमनेरजवळ दूधाचा टॅकर अडवून रस्त्यावर दूध सोडले. चांदवड, येवला आणि नांदगावला शेतकरी आंदोलन झाले. नाशिक बाजार समितीत मात्र काही शेतकरी लिलावात सहभागी झाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत