दुबईमध्ये व्हिसाशिवाय दोन दिवस फिरू शकतात भारतीय !

रायगड माझा वृत्त |

भारतीय पर्यटकांना आता दुबईमध्ये व्हिसाशिवाय दोन दिवसांचे वास्तव्य करता येणार आहे. संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

त्यानुसार भारतीय पर्यटकांना दोन दिवसांचा मोफत प्रवासी व्हिसा प्राप्त होणार आहे. दोन दिवसांचा मोफत ट्रान्झिट व्हिसा मिळणार, याचा अर्थ असा की दुबई किंवा अबुधाबीवरून प्रवाशांना जगभरात कोठेही जायचे असल्यास त्यांना ४८ तासांच्या वास्तव्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

अनेकांना खरंतर परदेशात जाण्याची इच्छा असते. पण आर्थिक अढचणींमुळे ते अनेकदा शक्य नसतं. त्यामुळे भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबईने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हालाही जर दुबईला फिरण्यासाठी जाण्याची इच्छा असेल तर तुम्हीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत