दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची तस्करी करणारे तिघेजण अलिबाग गुन्हे शाखेच्या जाळ्यात!

पाली : विनोद भोईर 

दुर्मीळ सापांची (मांडुळाची) तस्करी करणाऱ्या तीन जणांना अलिबाग रायगड गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन मांडूळ जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत सुमारे एक कोटी दहा लाख रुपये इतकी आहे.  गुप्तधन शोधून काढणे, आर्थिक वृद्धीसाठी, काळ्या जादूसाठी उपयोगी असल्याच्या अंधश्रद्धेतून या सापांची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. काही महिन्यापूर्वी देखील रायगड पोलिसांनी  या सापाची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. 

मिलिंद भास्कर मोरे (४६) रा.शिहू ता. पेण, जयवंत बाळकृष्ण देशमुख (५९) रा. आतोणे ता. सुधागड, रोहिदास लक्ष्मण तांडेल (४४) रा. बल्लाळेश्वर नगर पाली ता. सुधागड अशी आरोपींची नावे आहेत. सुधागड तालुक्यातील राबगाव येथील हॉटेल राबगाव व्हिलेज येथे या सापांच्या विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती अलिबाग रायगड गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानुसार शुक्रवार दि (२३) सायंकाळी १८.४५च्या सुमारास वरील हॉटेलच्या परिसरात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावत या तिघांना अटक केली.

त्यांच्याकडे असलेल्या पिवळ्या पिशवीत पोलिसांना तीन साप आढळून आले.अलिबाग गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शेख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवलदार डी.जी. पवार, पाटील, शेवते, १०१९ पाटील चालक पो.ह दबडे यांच्या पथकाने सदर कारवाई केली असून आरोपी विरोधात पाली पोलीस ठाण्यात गु/र,न ७५/२०१८ वन्यजीव सरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९(३)कलम ५१ नुसार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाली पो.नि रविद्र शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टी.एस.सावजी, नारायण चव्हाण करीत आहेत

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत