दुर्लक्षित भटक्या बेलदार समाजाला न्याय द्या; राज्य बेलदार समाज संघटना शासनाचे लक्ष वेधणार :राजेंद्र सांळूके

रायगड : अमूलकुमार जैन (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य शासनाकडून भटक्या बेलदार समाजाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटना शासनाचे वेधणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्यअध्यक्ष राजेंद्र साळुंके (राजू) यांनी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील निवासस्थानी केले. राजेंद्र साळुंके यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजेंद्र साळुंके हे पुढे म्हणाले की, समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पदवी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. जेणेकरून समाजातील ज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. असे देखील शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. शिक्षण नसल्याने काहीजण भरकटत चालले आहे. आमच्या समाजाची भटकंती थांबवायची असेल तर प्रथम आमच्या लोकांनां शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शासनाने ज्या गावामध्ये भटक्या समाजाची घरे ही शासकीय जागेत आहेत ती त्यांना अससेटमेंट लावून पूर्वरत करावी. जेणेकरून आमच्या समाजाची भटकंती थांबेल अन समाजाची उन्नती होण्यास सुरुवात होईल. असेही राजेंद्र साळुंके यांनी सांगितले.

आमची महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी लवकरच महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहोत. या दौऱ्यात प्रथम आमचा समाज जो विस्कळीत झाला आहे. त्यांना एकत्र आणणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महिलांचे प्रश्न हाताळण्यासाठी महिलांची सुध्दा विविध स्तरावर कार्यकारिणी करण्यात येणार असल्याचे सांळूके यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत