दुसरी कसोटी आजपासून : मालिकेत पुनरागमनाची धडपड, द. आफ्रिकेविरुद्ध भारतापुढे संघ निवडीचे जबर आव्हान

शनिवारपासून सुरू होत असलेल्या दुसºया कसोटीत विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ तयारीला लागला. तथापि यजमान संघाच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी अंतिम अकरा जणांत कुणाला संधी द्यावी याची डोकेदुखी मात्र कायम आहे.
पहिली कसोटी ७२ धावांनी जिंकून द. आफ्रिकेने मालिकेत आघाडी घेतल्यामुळे सलग नऊ मालिका विजयाचा भारताचा रेकॉर्ड उद्या पणाला लागणार आहे. भारताला २०१८-१९ या सत्रांत विदेशात १२ कसोटी सामने खेळायचे आहेत. ही त्यातील दुसरी कसोटी असेल. मालिकेत आव्हान टिकवायचे झाल्यास हा सामना जिंकणेही क्रमप्राप्त झाले आहे. द. आफ्रिका संघ २-० ने विजयी झाला तरी भारताच्या कसोटीतील अव्वल स्थानाला धक्का लागणार नसेल तरी भारताला मायदेशात टीकेचा सामना करावा लागेल.
दुसºया सामन्यासाठी संघ निवड थंड डोक्याने करावी लागणार आहे. अद्याप ४८ तास शिल्लक असताना भारतीय खेळाडूंनी ‘सुपरस्पोर्ट्स पार्क’वर चार तासांच्या सरावात चांगलाच घाम गाळला. चेतेश्वर पुजाराला पहिल्या स्लिपमधील झेलचा तर विराट आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजीचा सराव केला. अजिंक्य रहाणेने मात्र बघ्याची भूमिका घेतली. अजिंक्य आणि शिखर धवन यांनी साहाय्यक कोच संजय बांगरसोबत थ्रो डाऊनचा सराव केला. पण दोघांनाही फलंदाजीचा सराव करता आला नाही.
लोकेश राहुल, रहाणेच्या खेळण्याची शक्यता नाहीच…
लोकेश राहुल, मुरली विजय आणि पुजारा यांनी नेटवर फलंदाजीचा सराव केला. हार्दिक पांड्या आणि रिद्धिमान साहा हेदेखील पाठोपाठ सरावास आले. धवनऐवजी राहुलला संधी मिळणे निश्चित आहे. विदेशातील कसोटी सामन्यात धवनचा रेकॉर्ड खराब मानला जातो. दुसरीकडे राहुल तांत्रिकदृष्ट्या भक्कम आहे. रोहित व रहाणे यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. रोहितच्या निवडीवर टीका झाल्यानंतर कोहलीला स्वत:चा बचाव करावा लागला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत