दुसऱ्या महायुद्धातील ५०० किलोग्रॅमचा जिवंत बॉम्ब सापडला!

फ्रॉकफुर्ट (जर्मनी): रायगड माझा ऑनलाईन    

 

तुमच्या घराजवळ ५०० किलोग्रॅमचा बॉम्ब सापडला तर तुमची अवस्था काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशाच थरकाप उडवणारा अनुभव एक दोन नव्हे तर १८ हजाराहून अधिक लोकांनी घेतला. जर्मनीतील फ्रॉकफुर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने टाकलेला जिवंत बॉम्ब सापडला आणि एकच खळबळ उडाली.

दुसरे महायुद्ध होऊन आता जवळ जवळ ७० वर्षे झाली आहेत. पण जर्मनी आणि फ्रान्समध्ये युद्ध काळात टाकण्यात आलेले जिवंत बॉम्ब सापडतात. अशा प्रकारचे जिवंत बॉम्ब सापडने ही एक सामान्य बाब झाली असली तरी असा घटनांमुळे भितीचे वातावरण तयार होते.

जर्मनीच्या नाशक पथकाने रविवारी दुसऱ्या महायुद्धातील एक विशाल बॉम्ब डिफ्यूज केला. पण यासाठी त्या परिसरातील १८ हजार ५०० लोकांना त्यांचे घर सोडावे लागले. आठवड्यापूर्वी सापडलेला बॉम्ब पथकाने रविवारी डिफ्यूज केला. बॉम्ब सापडल्यानंतर प्रशासनाने सर्वांना रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत घर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर डिफ्यूजिंग ऑपरेशन सुरु झाले.

जर्मनीमध्ये सापडलेल्या ५००  किलोग्रॅम बॉम्बच्या आधी फ्रान्समधील नॉरमॅडी भागात एप्रिल महिन्यात २२० किलोचा बॉम्ब सापडला होता. तर फ्रॉकफुर्टमध्ये गेल्या वर्षी १.८ टनाचा बॉम्ब सापडला होता. तो बॉम्ब इंग्लंडने दुसऱ्या महायुद्धात टाकला होता. तेव्हा ६० हजार लोकांना परिसरातून बाहेर काढण्यात आले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत