देवगड मधील हापूसच्या पहिल्या पेटीला ७००० रुपये दर

देवगड : रायगड माझा वृत्त 

हापूसची पहिली पेटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे.  देवगड येथील आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी ती पाठवली. या पहिल्या हापूस पेटीला 7000 हजार इतका दर मिळाला.

गेले दोन वर्षे प्रकाश शिरसेकर वाशी मार्केटला पेटी पाठवत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कोकणातील हापूस मुंबईत दाखल झाला आहे. दरवर्षी प्रमाणे देवगडला हा मान मिळाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला देवगड मधील संजय बाणे आणि प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतील आंबा मुंबईला रवाना झाला. विशेष म्हणजे या दोन्ही शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्याला जुलैमध्येच मोहर आला होता. या मोहराचे व्यवस्थित संगोपन केल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार आंबा घेणे त्यांना शक्य झाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत