देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ ! एसआयटी मार्फत होणार चौकशी

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त
ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी SIT  probe jalyukta Shivar scheme; Big decision of the thackeray cabinet

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार हि महत्वकांक्षी योजना राबविण्यात आली होती. फडणवीसांची ही योजना अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने ठेवला होता. या  योजनेवर ९ हजार 634 कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यास फडणवीस अपयशी ठरले. त्यामुळे आता या कामाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय.राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती नेमली आहे. सेवानिवृत्त प्रमुख सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली हि समिती काम करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केली होती. तर कॅगने या योजनेवर ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगाने आता चौकशी होणार आहे. या योजनेसाठी ९ हजार कोटी खर्च झाले. मात्र त्याचा फायदा झाला नाही. ही योजना राबवूनही राज्यात टँकरची संख्या वाढली पण भूजल पातळी वाढली नाही. असा आरोप फडणवीसांवर करण्यात आलाय. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे झाली. त्या गावांमध्ये आजही टँकरने पाणी पुरवले जात आहे. हे देखील कॅगने निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे आतापर्यंत आलेल्या तक्रारीचा विचार करून ठाकरे सरकारकडून खुल्या चौकशीचा निर्णय घेण्यात आलाय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत