देवेंद्र फडणवीस यांचे आणखी ३ महिने वर्षा बंगल्यातच वास्तव्य

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

राज्यात कोणताच पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही. त्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी या शिफारशीच्या फाइलवर स्वाक्षरी केली. त्यामुळं आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारी निवासस्थान असलेला वर्षा बंगला रिकामा करायचा होता.

परंतु, त्यांना वाढीव मुदत देण्यात आल्याचं समजतं. त्यामुळे ते आणखी तीन महिने या बंगल्यात मुक्कामी असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी अर्ज केला होता आणि तो मंजूर करण्यात आला आहे. काही माजी मंत्र्यांनी मलबारस्थित बंगले रिकामे करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितली आहे. तर मंत्रालयासमोरील बंगले रिकामे करण्याची काही मंत्र्यांनी तयारी सुरू केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत