देशाचे चित्र बदलेल अशी अपेक्षा होती, मोदींनी जनतेचा भ्रमनिरास केला; शरद पवारांचा आरोप

मुंबई: रायगड माझा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने देशातील जनतेने कौल दिला आहे. ते पंतप्रधान झाल्यानंतर देशाचे चित्र बदलेल, अशी अपेक्षा जनतेला होती मात्र मोदींनी देशातील जनतेचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी अयशस्वी ठरल्याचेही टीकाही पवार यांनी यावेळी सांगितले. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात पवारांनी संबोधित केले.

देशात अनेक भागात मांसाहार केला जातो. तरीही गोमांसच्या संशयावरून मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडतात, हे अत्यंत निदंनिय आहे. दादरीमध्ये काही वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. एकाच्या घरात गोमांस असल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत त्याला जीव गमवावा लागला होता. मात्र, ते गोमांस नव्हतेच असा चौकशीचा अहवाल समोर आला होता. आता त्या व्यक्तीच्या कुटुंबांची जबाबदारी कोणाची? असा सवाल शरद पवार यांनी सरकारला केला आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील राज्या-राज्यांत, माणसा-माणसांत, समाजांत एकवाक्यता राहीली नाही. जातीय तेढ निर्माण झाली आहे. ही बाब चिंतेची असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत