देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ६३ लाखांचा टप्पा

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ६३ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ८२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १ हजार १८१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाख १२ हजार ५८५ वर पोहोचली आहे. तर देशात सध्या ९ लाख ४० हजार ७०५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ५२ लाख ७३ हजार २०२ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ९८ हजार ६७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत