देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ९० लाखांचा टप्पा

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ९० लाखांचा टप्पा देखील ओलाडंला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४५ हजार ८८२ नवे कोरोनाबाधित आढळले. तर, ५८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ४४ हजार ४०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९० लाख ४ हजार ३६६ वर पोहचली आहे. यापैकी ४ लाख ४३ हजार ७९४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ८४ लाख २८ हजार ४१० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आतापर्यंत १ लाख ३२ हजार १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत