देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांच्या पार

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज देशात देशात कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८२ हजार १७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.

यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३ इतकी झाली आहे. यापैकी सध्या ९ लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ५० लाख १६ लाख ५२१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आतापर्यंत ९५ हजार ५४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत