देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाखांच्या उंबठयावर

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

देशात कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आता ६३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८१ हजार ४८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत १ हजार ९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

यासह देशभरात एकूण ६३ लाख ९४ हजार ०६९ कोरोनाग्रस्त आहेत. सध्या देशभरात ९ लाख ४२ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ५३ लाख ५२ हजार ७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ९९ हजार ७७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत