देशातील पहिली OXYGEN एक्स्प्रेस रेल्वे ही कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना !

कळंबोली (रायगड) : अमूल कुमार जैन

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कळंबोली येथील रेल्वे स्थानकातून आज विशेष ऑक्सिजन ट्रेनद्वारे विशाखापट्टणम येथे लिक्वीड ऑक्सिजन आणण्यासाठी ट्रक टँकर पाठविण्यात येत आहे. टँकर चढवण्याकरिता लागणारया कळंबोली स्थानकात विशेष प्लॅटफॉर्म व विशेष ट्रॅक गेल्या 48 तासांत तयार करण्यात आला आहे.

विशाखापट्टनम येथे रेल्वेमार्फत राज्य सरकारला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात ऑक्सीजन चा तुटवडा कमी करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणण्यासाठी आणि रिकामे ऑक्सिजन सिलेंडर नेण्यासाठी रेल्वेने पूर्ण तयारी केली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायॉक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रवाना झाले आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर रेल्वेने हलवू शकतात का याचा शोध घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे संपर्क साधला होता. रेल्वेने तातडीने एलएमओ वाहतुकीची तांत्रिक शक्यता शोधून काढली.फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टँकरसह रो-रो सेवेद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करावी लागेल, असं रेल्वेने सुचवलं होते. रिकामे टँकर कळंबोली रेल्वे स्थानकांमधून ऑक्सिजन लोड करण्यासाठी वायॉक आणि जमशेदपूर / रौरकेला / बोकारो येथे पाठविले जातील. रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज आणि ओव्हरहेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या मर्यादमुळे अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे रस्ते टँकरच्या विविध वैशिष्ट्यांपैकी रोड टँकर टी 1618 चे मॉडेल लावले जाणे शक्य असल्याचे आढळले. हे टँकर 1290 मिमी उंचीसह सपाट वॅगनवर चढविण्यात आले आहेत.
वाहतुकीच्या सर्व चाचण्या रेल्वेकडून घेण्यात आल्या आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत