देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना राज ठाकरेंचे पत्र;पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन

मुंबई : रायगड माझा वृत्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले असून त्यांनी या पत्रात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा (ईव्हीएम) वापर निवडणुकीत बंद होणार नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी हे पत्र फेसबुक पेजवर शेअर केले आहे.

raj-thakre1

आपण खूप आधीपासून ईव्हीएम मशीन्समध्ये गडबड असल्याचे ऐकत आहोत. ईव्हीएम मशीनमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून फेरफार केल्याची कुजबुज सुरु झाल्यानंतर या दाव्याला प्रत्येक निवडणुकीत पुष्टी मिळत गेली. तुमच्या माझ्या पक्षाच्या नगरसेवक, आमदारांनी असंख्य मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी करुन देखील पराभव झाला. काही ठिकाणी उमेदवारांना शून्य मत मिळाली हे पटूच शकत नाही.

ईव्हीएम मशीन येणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील तर निवडणुका का घ्यायच्या ? लोकशाहीत मतदार हाच अंतिमत: राजा असतो पण याच तत्वाला हरताळ फासण्याचे काम मागची ३ ते ४ वर्ष सुरु आहे.

हा विषय गंभीर असून निवडणूक आयोग जो पर्यंत व्हीव्हीपॅट मशिन्स किंवा मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करुन देत नाही, तो पर्यंत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालावा. त्यामुळे येणा-या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनवरून राजकारण पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत